अहिल्यानगरअंधाराचा गैरफायदा घेत मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ; नगर तालुक्यातल्या जखणगावातला संतापजनक...

अंधाराचा गैरफायदा घेत मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ; नगर तालुक्यातल्या जखणगावातला संतापजनक प्रकार; राज हसन शेखविरुद्ध गुन्हा दाखल

Published on

spot_img

अंधाराचा गैरफायदा घेत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा एका वासनांध युवकानं प्रयत्न केलाय. नगर तालुक्यातल्या जखणगांव इथल्या पाण्याच्या टाकीजवळ काल (दि. १८) रात्री साडे दहाच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं. याप्रकरणी राज हसन शेख या वासनांध तरुणाविरुध नगर तालूका पोलीस ठाण्यात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

यासंदर्भात पिडित मुलीच्या वडिलांनी रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी बोलताना सांगितलं, पाण्याची टाकी भरल्यानंतर ती ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे मोटर बंद करण्यासाठी मी तिथे गेलो असता कुणी तरी अज्ञात इसम अंधाराचा गैरफायदा घेत माझ्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असल्यानं तिने आरडाओरडा केला. मात्र मी तिथे जाईपर्यंत तो पळून गेला.

माझ्या मुलीला मी विचारले असता तिने राज हसन शेख हा अतिप्रसंग करण्यासाठी मला ओढून नेत होता, असं सांगितलं. त्यानंतर मी त्याच्या घरी राज हसन शेखच्या आई आणि बापाला याप्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलो. मात्र तिथं हसन शेख आणि त्याच्या नातेवाईकांनी आमच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात माझ्या मुलीच्या डाव्या डोळ्याला मोठी जखम झाली.

त्यानंतर मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करुन आम्ही नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो. दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी या प्रकरणी राज हसन शेख याच्याविरुद्ध पहाटे गुन्हा दाखल केला.

आणखी महत्वाच्या बातम्या