छत्रपती संभाजीनगरच्या शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केलेल्या नेवासे तालुक्यातल्या सोनई इथं राहत असलेल्या परंतू फरार असलेल्या बेपत्ता ‘मास्टरमाईंड’ अमोल उर्फ ‘तुका’ या तरुणाविरुध्द बेंगलोर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
दरम्यान, मास्टर माईंड ‘तुका’ बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे ‘वायरमन’ असलेल्या वडिलांनी दिलेली आहे. त्या तक्रारीनुसार सोनई पोलिसांनी ‘मिसिंग’चा गुन्हा दाखल केलाय. परंतू ‘तुका’विषयी
पोलिसांना अद्यापपर्यंत कुठलीही माहिती मिळालेली नाही.
सोनई पोलिसांना ‘सीडीआर’ही मिळेना…!
शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप असलेला ‘तुका’ बेपत्ता होऊन अनेक दिवसांचा कालावधी लोटला. मात्र तरीही पोलिसांना ठोस माहिती मिळाली नाही. दरम्यान, ‘तुका’विरुध्द शेअर मार्केटमध्ये घोटाळा केल्याच्या तक्रारी असल्यानं पोलिसांनी त्याचे फोन कॉल्स डिटेल्स (सीडीआर) मागितला. मात्र पोलिसांना तो अद्यापही मिळू शकलेला नाही. त्यामुळे आता सोनई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
‘तुका’च्या घरच्यांना ना काळजी ना चिंता…!
एखाद्या घरातली व्यक्ती बेपत्ता झाली तर ते संपूर्ण कुटूंब, जवळच्या नातेवाईकांसह मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. पाहुणे आणि नातेवाईकांकडे बेपत्ता झालेल्या व्यक्तीविषयी विचारपूस करतात. मात्र बेपत्ता झालेल्या ‘तुका’विषयी कुठंही साधी चौकशी केली नाही. जसं काहीच विपरीत घडलं नाही, अशा थाटात ही मंडळी वागताहेत. या मंडळींना बेपत्ता ‘तुका’विषयी ना काळजी ना चिंता, असंच सध्याचं चित्र आहे.