राहुरी तालुक्यातल्या वळण इथं राहणाऱ्या देवानंद मकासरे या इसमानं एका 24 वर्षीय विवाहितेला पळवून नेल्याचा आरोप घोडेगावच्या महिलेनं केला होता. यासंदर्भात सोनई पोलीस ठाण्यासमोर लताबाई ठोंबरे या महिलेने ऐन स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण सुरू केलं होतं.
सोनई पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी हे उपोषण मात्र मोठ्या कुशलतेनं हाताळलं. विवाहितेला पळवून नेणाऱ्या आरोपीला पंधरा दिवसांच्या आत अटक करू, अशी ग्वाही उपोषणकर्त्या ठोंबरे यांना एपीआय माळी यांनी दिली. त्यामुळे समाधान झाल्यानं सदर महिलेने आमरण उपोषण स्थगित केलं.
उपोषणकर्त्या महिलेसह तिचा मुलगा किशोर ठोंबरे या दोघांना एपीआय माळी यांनी उपोषणापासून यशस्वीरित्या परावृत्त केलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मेढे उपस्थित होते.