अहिल्यानगरअहमदनगरच्या 'त्या' नालायक डॉक्टरची मुजोरी ; रुग्णाला चक्क गोडाऊनमध्ये केलं ॲडमिट ...!

अहमदनगरच्या ‘त्या’ नालायक डॉक्टरची मुजोरी ; रुग्णाला चक्क गोडाऊनमध्ये केलं ॲडमिट …!

Published on

spot_img

अहमदनगर शहरातल्या तारकपूर बसस्थानकासमोर असलेल्या एका अलिशान खासगी रुग्णालयात नुकताच एक संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या खासगी रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्या एका रुग्णाला चक्क गोडाऊनमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. या संदर्भात संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ टाकला. त्यानंतर संबंधित मुजोर डॉक्टर भानावर आला आणि रुग्णाला जनरल वार्डमध्ये ॲडमिट करण्यात आलं.

राहुरी तालुक्यातल्या कोंढवड इथला हा रुग्ण एका अपघातात जखमी झाला होता. या रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या नातेवाईकांनी पैसे जमा करुन त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीदेखील या कुटुंबाला आर्थिक मदत केली.

संबंधित नालायक डॉक्टरनं या रुग्णाच्या नातेवाईकांना कुठलीही दया माया नं दाखवता अडीच लाख रुपये मागितले. या रुग्णाच्या नातेवाईकांनी मेडिसिनचे 80 हजार आणि दवाखान्याचं बील 45 हजार रुपये भरले. मात्र रुग्णाला चक्क गोडाऊनमध्ये ॲडमिट करण्यात आल्यानं नातेवाईकांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली.

या संदर्भात संबंधित रुग्णाचे नातेवाईक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करणार आहेत. राज्याचं सरकार लाडकी बहीण योजना सुरू करून जनतेला भुलवण्याचं काम करत आहे. मात्र दुसरीकडे नगरमध्ये एक नालायक डॉक्टरनं अशा पद्धतीनं उपचार देऊन गोरगरीब जनतेची थट्टा सुरु केली आहे. या डॉक्टरच्या दवाखान्याचा आणि संबंधित डॉक्टरचा परवाना सरकारनं रद्द करावा, अशी मागणी या निमित्तानं केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या