रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
काल (दि. ४) दुपारी तीन वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकीतल्या इच्छुकांचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. काही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या उमेदवारी अर्ज तसेच राहिले. मात्र ज्या उमेदवारांचे अर्ज राहिले, ते अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत. दरम्यान, राहता विधानसभा मतदारसंघात राजेंद्र पिपाडा हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. राधाकृष्ण विखे यांच्यासमोर त्यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासे, राहता, श्रीगोंदा, कर्जत – जामखेड, नगर – राहुरी या मतदारसंघातल्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढू लागला आहे. उमेदवारांचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतले मेळावे, प्रचार फेऱ्या यांना आता वेग आला आहे. अहिल्यानगर शहरासह या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात कोण कोण आमने-सामने लढणार आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आपणांस देत आहोत. ती माहिती पुढील प्रमाणे आहे.
अहिल्यानगर शहर मतदारसंघ
१ संग्राम जगताप महायुती अजित पवार
२ अभिषेक कळमकर माविआ शरद पवार
3 शशिकांत गाडे. अपक्ष.
अकोले मतदारसंघ
१ किरण लहामटे महायुती अजित पवार
२ अमित भांगरे मविआ शरद पवार गट
३ वैभव पिचड अपक्ष
संगमनेर मतदारसंघ
१ अमोल खताळ महायुती शिंदेसेना
२ बाळासाहेब थोरात मविआ काँग्रेस
श्रीरामपूर मतदारसंघ
1 लहू कानडे महायुती अजित पवार
२ हेमंत ओगले मविआ काँग्रेस
३. भाऊसाहेब कांबळे महायुती शिंदेसेना
कोपरगाव मतदार संघ
१ आशुतोष काळे महायुती अजित पवार
२ संदीप वर्पे, मविआ शरद पवार
राहुरी मतदारसंघ
१ शिवाजीराव कर्डिले महायुती भाजपा
२ प्राजक्त तनपुरे मविआ शरद पवार
नेवासा मतदार संघ
विठ्ठल लंघे महायुती सेना शिंदे
२ शंकरराव गडाख महाविकास आघाडी उबाठा 3 बाळासाहेब मुरकुटे अपक्ष
शेवगाव मतदारसंघ
१ मोनिका राजळे महायुती भाजप
२ प्रताप ढाकणे मविआ शरद पवार
३ चंदशेखर घुले अपक्ष
४ हर्षदा काकडे अपक्ष
श्रीगोंदा
१ विक्रमसिंह पाचपुते महायुती भाजप
२ अनुराधा नागवडे महाविकास आघाड़ी उबाठा
3 राहुल जगताप अपक्ष
४ अण्णासाहेब शेलार वंचित आघाडी
कर्जत-जामखेड
१ प्रा. राम शिंदे भाजपा
२ रोहित पवार मविआ शरद पवार
पारनेर मतदारसंघ
1काशिनाथ दाते महायुती अजित पवार
२ राणी लंके मविआ शरद पवार
3 विजय सदाशिव औटी अपक्ष
४ संदेश कार्ले अपक्ष
5 मा. आ. विजय औटी अपक्ष
शिर्डी मतदारसंघ
१ राधाकृष्ण विखे महायुती भाजपा
2 प्रभावती घोगरे मविआ काँग्रेस
३ राजेंद्र पिपाडा अपक्ष.