अहिल्यानगरआई तुळजाभवानी माते! 'दुर्गा' होऊन 'या' वासनांध नराधमांच्या नरडीचा घोट घे...!

आई तुळजाभवानी माते! ‘दुर्गा’ होऊन ‘या’ वासनांध नराधमांच्या नरडीचा घोट घे…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर

राज्यात अल्पवयीन मुली आणि महिला अजिबात सुरक्षित नाहीत. दुर्दैवानं सरकारचं याकडे बिलकुल लक्ष नाही. दररोज कुठं ना कुठं महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जात आहे. या निमित्तानं आई तुळजाभवानीला एकच साकडं घालायचं आहे, की ‘दुर्गा’ होऊन ‘या’ वासनांध नराधमांच्या नरडीचा घोट घे.

बदलापूरच्या घटनेनंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. धावत्या स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

या प्रकरणामुळे पुण्यात संतप्त वातावरण झालंय. पुण्यातल्या वानवडी येथे ही घटना घटलीय. धक्कादायक बाब अशी, की बसचालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी बसचालकाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यात चालत्या स्कूल बसमध्ये बसचालकानं दोन अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातल्या वानवडी परिसरात हा धकादायक प्रकार घडलाय. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधम स्कूल बसचालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

बस चालकानं सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर मागील चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केला. राज्याचा गृहविभाग सध्या काय करतो आहे, हा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे. खरं तर सदरचा बसचालक हा त्या अल्पवयीन मुलींचा एका अर्थानं रक्षक होता. मात्र जबाबदारीचं भान न ठेवता त्यानं रक्षकाऐवजी भक्षकाची भूमिका पार पाडली. या अशा वासनांध नराधमांना भरचौकात फाशी देण्याचा कायदा करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या