सुजान वाचकहो, नमस्कार. मी बाळासाहेब शेटे पाटील. गेल्या 26 वर्षांच्या पत्रकारितेत विविध विषयांवर मी केलेलं लिखाण आपण सातत्यानं वाचलं आहे. त्यातलं बरंचसं तुम्हाला आवडलं असेल बरचसं आवडलं नसेल. मात्र तुमच्या सदिच्छा कायम माझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि यापुढेदेखील राहतील, अशी मला ठाम खात्री आहे.
माझे मित्र करण गारदे (कार्यकारी संपादक, रोखठोक 24 न्युज नेटवर्क) यांच्या सहकार्याच्या पाठबळावर आजपासून मी एक नवी सुरुवात केली आहे. आम्ही यापुढे एका वेगळ्या ओळखीतून दररोज आपल्याशी बातम्या आणि मुलाखतींच्या माध्यमातून संपर्कात राहणार आहोत.
आपल्या काही सूचना असतील तर आम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्या अवश्य कळवाव्यात. आपल्या काही बातम्या असतील तर त्यादेखील आम्हाला द्याव्यात. त्या बातम्यांना प्रसिद्धी देण्याचं काम आम्ही करणार आहोत. तूर्तास इतकंच, धन्यवाद.