बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवीदिल्लीतल्या सत्ताधारी महायुतीच्या प्रमुख आणि अतिवरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. आत्तापर्यंत 110 जागांचा फैसला झाला असून उद्या अर्थात शुक्रवारी (दि. 18) उमेदवारांची पहिली यादी प्रसारित होणार आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र नेवासा मतदारसंघात मात्र वेगवेगळ्या बातम्या सोशलमिडियावर येत आहेत. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या ‘सोर्स’नुसार विधानसभा निवडणुकीची संभाव्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आमच्या (रोखठोक 24 न्युज नेटवर्क) नवीदिल्लीतल्या ‘सोर्स’नुसार स्वतंत्र नेवासा मतदारसंघाची जागा शक्यतो भाजपकडेच राहणार आहे. असं झाल्यास युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. नेवासे तालुक्यातल्या युवकांचा ऋषिकेश शेटे पाटील यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. प्रस्थापिताविरुद्ध कधीही, कुठेही दंड थोपटणारा आणि अजिबात ‘मॅनेज’ न होणारा युवा नेता म्हणून ऋषिकेश शेटे पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे.
दुसऱ्या बाजूला नेवासे तालुक्यातले उद्योजक प्रभाकर काका शिंदे यांच्या नावाचाही संभाव्य उमेदवार म्हणून विचार होत आहे. मात्र स्वतंत्र नेवासा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेल्यास प्रभाकर काका शिंदे यांना उमेदवारी मिळू शकते. एका अर्थाने स्वतंत्र नेवासे विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाख
यांना ऋषिकेश शेटे पाटील
किंवा प्रभाकर काका शिंदे
या दोघांपैकी कोणी तरी एक जण ‘टफ फाईट’ देणार आहे. उद्या (दि. 18) संध्याकाळपर्यंत किंवा परवा अर्थात शनिवारपर्यंत (दि. 18) स्वतंत्र नेवासे विधानसभा मतदारसंघातलं विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे.