रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहर मतदारसंघातून या मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम अरुणकाका जगताप यांनी आज (दि. २४) शिवसेना (शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आमदार जगताप म्हणाले, ‘विकास कामांच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढविणार आहोत. सतत लोकांमध्ये राहणारा आमदार अशी आपली प्रतिमा झाली असून लोकसंपर्काच्या पाठबळावर ही लढाई आपण सहजासहजी जिंकणार आहोत. नगरच्या सूज्ञ नागरिकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे’.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, भाजपचे भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नरेंद्र कुलकर्णी, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक किशोर डागवाले, माजी नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक सचिन जाधव, प्राध्यापक माणिक विधाते, प्राध्यापक अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अविनाश घुले आदी उपस्थित होते.