400 चाकी वाहनं तर 1 हजार दुचाकी वाहनं आणि लाखो मराठा समाज बांधवांचा सहभाग असलेल्या शांतता रॅलीमुळे नगरमध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागानं उद्या अर्थात सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या नगरमध्ये शांतता रॅली काढण्यात येणार आहे. जरांगे पाटील पुण्याहून नगरला येत आहेत. नगरच्या केडगावमध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.
नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह नगर शहर आणि परिसरातल्या मराठा समाज बांधवांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. नगरच्या माळीवाडा भागात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून या शांतता रॅलीला प्रारंभ होणार आहे. चौपाटी कारंजा इथं या रॅलीची सांगता होणार असून या शांतता रॅलीमध्ये पाच हजार स्वयंसेवक नियोजन आणि व्यवस्थेचं काम पाहत आहेत. या शांतता रॅलीमुळे नगर शहर आणि परिसरातल्या सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.