अहिल्यानगरऐकलं का नगरकरांनो! 'या' निर्लज्ज उपायुक्तानं त्याच्या पुतणीसोबतच केलंय 'हे' असं काही!...

ऐकलं का नगरकरांनो! ‘या’ निर्लज्ज उपायुक्तानं त्याच्या पुतणीसोबतच केलंय ‘हे’ असं काही! वाचून तुम्हीही व्हाल ‘हँग’!

Published on

spot_img

‘जमाना बदलला आहे’ किंवा ‘जमाना बदल गया हैं’, असं सातत्यानं तुम्ही ऐकलं असेल. पण जमाना इतका बदललेला असंल, याची तुम्ही स्वप्नातदेखील कल्पना केली नसेल. त्यामुळेच आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत, की एका निर्लज्ज उपायुक्तानं त्याच्या चक्क पुतणीसोबतच लग्न केलं आहे. लग्नाच्या गाठी वर म्हणजे स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं. पण या चुलता आणि पुतणीची लग्न गाठ नक्की स्वर्गातच बांधली असेल का, अशी शंका घ्यायला याक्षणी प्रचंड वाव आहे.

सुदैवानं ही घटना आपल्या महाराष्ट्रातली नाही. तर कायदा पायदळी तुडविण्यात सर्वात वरच्या क्रमांकावर असलेल्या बिहारमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एखादी गंभीर घटना घडल्यानंतर उगीच असं म्हटलं जात नाही, की महाराष्ट्राचा ‘बिहार’ झालाय.

बिहारमध्ये असलेल्या बेगलसुराय महानगरपालिकेतल्या उपायुक्तांनी आपल्या पुतणीबरोबर लग्न केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय शिवशक्ती कुमार यांनी त्यांची पुतणी सेजल सिंधूबरोबर लग्न केलं आहे. सेजल ही 24 वर्षांची असून या दोघांचा 14 ऑगस्ट रोजी कात्यायनी मंदिरामध्ये विवाह पार पडला.

या विचित्र विवाहाची संपूर्ण शहरामध्ये चर्चा असताना सेजलने उघडपणे या लग्नाचं समर्थन केलं आहे. ‘आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडून कोणताही गुन्हा केलेला नाही. आम्ही आमच्यासमोर असलेल्या आव्हानांपासून पळून जाणार नसून त्यांचा सामना करणार आहोत’, असं सेजलने आत्मविश्वासानं सांगितलं आहे. तसेच शिवशक्ती कुमार यांच्या कुटुंबियांनी आमच्याविरुद्ध चुकीची तक्रार दाखल केल्याचा दावाही सेजलनं केला आहे.

प्रेम हे आंधळं असतं म्हणतात. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हे किमान उपायुक्त असलेल्या शिवशक्ती कुमारला तरी कळायला हवं होतं. कारण पुतणी ही मुलीसारखी असते. अशा परिस्थितीत मुलीसमान असलेल्या पुतणीसोबत लग्न करण्याचा ‘ट्रेंड’ महाराष्ट्रात तरी अजून आलेला नाही.

दरम्यान, भविष्यात या दोघांना जी अपत्ये म्हणजे मुलं- मुली होणार आहेत, मोठी झाल्यानंतर त्यांना समजलं, आपले आई-वडील यांच्यात चुलता आणि पुतणीचं नातं आहे. त्यानंतर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल, याचा तरी या दोघांनी विचार केला आहे का, हाच मोठा प्रश्न आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या