रोखठोक 24 न्यूज नेटवर्क / अहमदनगर
तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये प्रसाद रुपाने ज्या लाडूचं वितरण केलं जातं, त्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशाचं तेल असल्याचा धक्कादायक प्रकार मध्यंतरी समोर आला होता. हा प्रकार म्हणजे सनातन धर्माला बदनाम करण्याचं षड्यंत्र असून आंध्रप्रदेश सरकारने कठोर कायदे करुन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, असं मोठं वक्तव्य बागेश्वरधामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे.
तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये लाडूच्या प्रसादात जनावरांची चरबी असल्याचा दावा जर खर असेल तर हा खरोखर खूप मोठा अपराध आहे. भारताचा जो सनातन धर्म आहे, तो बदनाम करण्यासाठी एक मोठा षडयंत्र रचलं जात आहे. भगवान वेंकटेश्वरांच्या लाडू प्रसादात जर जनावरची चरबी आणि माशाचं तेल वापरलं जात असेल तर वर्तमान काळातलं हे फार मोठे दुर्दैव आहे.
या प्रकाराची अत्यंत बारकाईने तपासणी झाली पाहिजे. सरकारने लवकरात लवकर हिंदूंची सर्व मंदीरं हिंदू बोर्डाच्या ताब्यात द्यावीत. ज्यामुळे कोणत्याही सनातनी व्यक्तीच्या श्रद्धा आणि भक्तीला हानी पोहोचणार नाही, असं देखील धरेंद्र कृष्णशास्त्री म्हणाले.