नाथ संप्रदायाचे प्रचारक आणि नवनाथांपैकी एक असलेल्या चैतन्य सद्गुरु कानिफनाथ महाराजांचा उद्या (दि. ९) प्रकटदिन आहे. यानिमित्त केडगावच्या भूषणनगरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कानिफनाथ मठात सायंकाळी सहा कानिफनाथ महाराज पाळणा, साडेसहा वाजता महाआरती आणि सायंकाळी सात वाजता पंचक्रोशीतल्या नाथ भक्तांना महाप्रसादाचं वाटप होणार आहे. या कार्यक्रमाला नाथ भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं, असं आवाहन मठाधिपती सुषमा माई गायकवाड यांनी केलं आहे.