अहिल्यानगरकोतवाली पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा ; १७ गोवंशीय जनावरांची केली सुटका ...!

कोतवाली पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा ; १७ गोवंशीय जनावरांची केली सुटका …!

Published on

spot_img

दिनांक ०२/०८/२०२४ रोजी कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला झेंडीगेट मस्जिद क्रं २२ समोर एका बंद वाडग्यात काही गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याकरीता डांबून ठेवले आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री केली.

त्यावेळी आरोपी नामे कादर मुसा शेख (रा. निजामगल्ली कोठला, अहमदनगर) याच्या कब्जात एकूण ३,१०,०००/- रु. कि च्या लहान मोठ्या आकाराच्या विवीध रंगाच्या गोवंशीय जातीचे गाई, वासरे, बैल असे मिळुन आली‌

ते सर्व ताब्यात घेऊन गोवंशीय जनावरांचे योग्य प्रकारे निगा राखणे व चारा पाणी याची व्यवस्था होणे करीता त्यांना पांजर पोळ गोपालन संस्था अरणगांव व येथे सुखरुप सोडलं.

पोकाँ/ सतिष मारुती शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नं /२०२४ BNS २०२३ चे कलम २७१ सह महा पशु संरक्षण अधिनियम कलम ५ (क), ९ (अ) तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवयास प्रतिबंध अधि ११ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, सतिष भांड, गणेश धोत्रे, विशाल दळवी, पोना सलीम शेख, अविनाश वाकचौरे, पोकाँ. अमोल गाढे, अतुल काजळे, सतीश शिंदे, मपोहेकाँ तोरडमल, पोकाँ अभय कदम यांच्या पथकानं केली.

आणखी महत्वाच्या बातम्या