गरजवंताला अक्कल नसते, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. शेअर मार्केटच्या दलालांकडून गुंतवणूकदारांना जे ‘गाजर’ दाखवलं जातं, ते आज ना उद्या मिळेल, या आशेपोटी गुंतवणूकदार संभाव्य परिणामांची पर्वा न करता आर्थिक गुंतवणूक करत आहेत.
खरं तर अशी आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी गुंतवणूकदारांची लेखी तक्रार आल्यावर लवकरात लवकर पडताळणी करुन संबंधितांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा असते. मात्र तब्बल 16 दिवस उलटूनही गुन्हा दाखल केला जात नाही. गुंतवणूकदारांच्या लेखी तक्रारीला केराची टोपी दाखवत वरिष्ठांकडे बोट दाखवलं जातं.
नेवासे तालुक्यातल्या सोनई पोलिसांकडून असा प्रकार घडला आहे. ज्यांची आर्थिक फसवणूक झाली, त्या शरद काळे पाटील यांनी या संदर्भात लेखी तक्रार असताना गुन्हा दाखल करायला सोनईच्या पोलिसांना वरिष्ठांच्या परवानगीची गरज का भासतेय, असा सवाल रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी बोलताना उपस्थित केलाय.
शेअर मार्केट हा जुगार नाही. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास परतावा नक्की मिळतो. मात्र शेअर मार्केटमध्ये काही स्वार्थी आणि बोगस मंडळींचा शिरकाव झालेला आहे. यातले दलाल सामान्यांकडून घेतलेला पैसा भलतीकडेच गुंतवितात आणि त्यांची फसगत होते. त्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या कुठे होती रुपयांच्या ‘डिपॉझिट्स’वर होतो. शेअर मार्केटमध्ये एकटे शरद काळे पाटील हेच फसले गेले नाहीत. अशा अनेकांची यामध्ये आर्थिक फसवणूक झाली आहे. काळे पाटील हे यासंदर्भात नक्की काय म्हणाले, हे आता तुम्हीच पहा आणि ऐका.