रोखठोक 24 न्युज नेटवर्क / कोल्हापूर
महायुतीची संयुक्त सभा काल (दि. ५) कोल्हापुरात संपन्न झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) यांनी कोल्हापुरातून महायुतीच्या जाहीरनाम्यातल्या 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिलीय.
ते म्हणाले, ‘ही सभा खूप ऐतिहासिक आहे. 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशिर्वाद दिला आहे, आजदेखील आई अंबाबाई आम्हाला आशिर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी महायुतीच्या वचननाम्यातल्या 10 कलमं जनतेच्यासमोर ठेवतो आहे’.
लाडक्या बहिणींना (Ladki bahin yojana) 2 हजार 100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली. तसेच आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.
कोल्हापूरच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्यावतीने 10 वचने जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून तत्पूर्वीच जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. त्यामध्ये, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘विरोधक लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून कोर्टात गेले. आता नागपूरचा कोण तरी कोर्टात गेला आहे. कोणाच्या ‘माय का लाल’ आला तरी ही योजना बंद होणार नाही, तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आम्ही आखडते घेणार नाही. आम्ही दिल्लीला जातो तर म्हणता दिल्लीला जातात, आम्ही निधी आणायला जातो. पण तुम्ही दिल्लीला जाता की माझा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा म्हणून. मात्र, तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुमचा चेहरा नको आहे, तर महाराष्ट्रातील जनता कशी स्वीकारेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील केलेल्या 10 घोषणा
1) लाडक्या बहिणींना रु. 2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रुपये 2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन.
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!
3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन! निवृत्ती वेतन (डोल) धारकांना रु.2100 रुपये देण्यात येणार. महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन.
5) राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन.
6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!
7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार. राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!
9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!
10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचं वचनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाहीरनाम्याद्वारे दिलं आहे.