अहिल्यानगरझालं बरं का परिवर्तन...! 'एसपी ऑफिस'नं दिलं 'अहिल्यानगर' नाव...!

झालं बरं का परिवर्तन…! ‘एसपी ऑफिस’नं दिलं ‘अहिल्यानगर’ नाव…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क /अहिल्यानगर

इतिहासातली तब्बल पाचशे वर्षांची ओळख असलेल्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला आता नवं नाव मिळालंय. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार या जिल्ह्याला आता अहिल्यानगर हे नाव मिळाल. या जिल्ह्याच्या एसपी ऑफिसनंही या परिवर्तनाचा स्विकार केला आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या भिंतीवर अहमदनगरऐवजी अहिल्यानगर हे नाव लावण्यात आलं.

दरम्यान, या शहरासह जिल्ह्याला जे अहिल्या नगर हे मिळालं, त्या नावाला कोणाचा लेखी हस्तक्षेप किंवा आक्षेप नाही. पण अहमदनगर हे नाव बदलण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयावर विशिष्ट समाजाची नाराजी आहे. मात्र कोणाच्याच भावनांचा यासंदर्भात विचार करण्यात आलेला नाही. किंबहूना नगरच्या नामांतरबाबत स्थानिक नागरिकांच्या हरकती मागविल्या गेल्या नाहीत, अशीही चर्चा यानिमित्तानं ऐकायला मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या