अहिल्यानगर... तर ड्रोनच्या ऑपरेटरला होऊ शकते कठोर शिक्षा ; रात्रीचे ड्रोन :...

… तर ड्रोनच्या ऑपरेटरला होऊ शकते कठोर शिक्षा ; रात्रीचे ड्रोन : अफवा आणि वास्तव…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क/ अहमदनगर

विज्ञान आणि तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली तरी आपल्याकडे अफवा या सुरुच राहतात, याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. पुणे, बारामती, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये अफवांचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे आणि येत आहे. अगदी नेवासे तालुक्यातल्या सोनई आणि परिसरातला कालचाच (दि. २७) प्रसंग जरा विचारात घेतला, तर अफवा जितक्या गंमतीशीर असतात, तितक्याच त्या भिती निर्माण करणाऱ्या असतात, याचा अनुभव सोनई – कांगोणी रस्त्यालगतच्या शेटे पाटील वस्ती, जगताप वस्ती, वडघुले वस्ती, करमाळे वस्ती, मुथा फॉर्म, हनुमानवाडी, विठ्ठलवाडी, खोसे वस्ती, हिंगोणी, कांगोणी, खरवंडी, वडाळा बहिरोबा आदी ठिकाणी अनेकांना आला. अतिशय खाली आलेल्या ‘ड्रोन’ची या परिसरात जोरदार चर्चा ऐकायला मिळाली.

वास्तविक पाहता हे ड्रोन ज्यावेळी उडवले जातात, त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं अत्यंत गरजेचं असतं. सन 2018 मध्ये लागू झालेल्या सीएआर अर्थात सिव्हिल ॲव्हेशन रिक्वायरमेंट या कायद्यानुसार 250 ग्रॅम वजनापेक्षा जास्त वजनाचा ड्रोन उडवत असताना संबंधित ड्रोनची ऑपरेटरनं सक्षम अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. परंतु असं न करणाऱ्या ड्रोनच्या ऑपरेटरला कठोर शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, ड्रोन उडवण्याच्या संदर्भात पुणे जिल्ह्यात एक वेगळं वास्तव समोर आलं आहे. जमिनीचं सर्वेक्षण करण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत असून राज्य सरकारच्या कार्यकक्षेत जी योजना आली आहे, त्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

अफवा आणि वास्तव यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. अफवा या भीती निर्माण करतात तर वास्तव हे प्रत्येकामध्ये धाडस निर्माण करतं. एका अर्थानं अफवा हा अंधार आहे तर वास्तव हे सूर्यप्रकाश आहे.

अफवांच्या रुपातला भितीयुक्त अंधार कितीही वेळ असला तरी कधी ना कधी वास्तवातला सूर्यप्रकाश येतो आणि सारं काही खरं खरं सांगून जातं. त्यामुळे निदान शहाण्या आणि जबाबदार माणसानं तरी अफवा पसरवू नये, इतकंच. धन्यवाद.

आणखी महत्वाच्या बातम्या