अहिल्यानगर... तर मनोज जरांगे यांच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार 'हा' मराठा...

… तर मनोज जरांगे यांच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार ‘हा’ मराठा तरुण…! रक्तानं लिहिलंय जरांगेंना पत्र …!! ‘त्या’ तरुणाची ओळख मात्र पटेना…!!!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे यांची भूमिका महायुतीसाठी पोषक आहे. उमेदवार उभे केले तर मराठा समाजातील मतांमध्ये फूट पडणार असून याचा फायदा शिवसेना – भाजपाला होणार आहे. शिंदे, सामंत, चिवटे यांच्या नादाला लागून समाजाची वाट लावू नका. नाही तर तुमच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार, असं रक्तानं लिहिलेलं पत्र सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


दरम्यान, या पत्राच्या शेवटी सही करण्याऐवजी रक्तानं भिजलेला अंगठा देण्यात आला असून हे पत्र नक्की कोणी लिहिलंय, पत्र लिहिणाऱ्या तरुणाचं नाव काय तो कुठला आहे, याविषयी कुठलीच माहिती मिळत नाही. त्यामुळे हे पत्र लिहिणाऱ्या तरुणाची अद्यापतरी ओळख पटलेली नाही.

मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे व्यथित झालेल्या एका मराठा समाजातल्या तरुणानं रक्ताने हे पत्र लिहिलं आहे. मनोज जरांगे यांची भूमिका महायुतीसाठी पोषक आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. मराठा समाजातील मतांमध्ये फूट पडणार आहे, असंही संबंधित तरुणाचं म्हणणं आहे.

मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, त्यामुळे मराठा समाजातल्या मतांमध्ये फूट पडणार असल्याचे पत्रात नमूद आहे. इच्छुक मराठ्यांमध्ये भांडणे लावू नका, असं या पत्राद्वारे जरांगेंना सांगण्यात आलं आहे. शिंदे, सामंत, चिवटे, यांच्या नादाला लागून समाजाची वाट लावू नका. नाही तर तुमचे नाव लिहून मी आत्महत्या करणार, असं पत्रात म्हटले गेले आहे. असं जरी असलं तरी या पत्रामध्ये कोणाचे नाव नसून ‘अंगठा’ छापलेला आहे. यामुळे रक्ताने पत्र लिहिणारा तरुण कोण, हे ओळखता आलेलं नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या