रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडाळा बहिरोबा इथं दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता टाटा सुमोमधून आलेल्या चोरट्यांनी तलवारीच्या धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत धाडसी चोरी केली. चोरट्याने पवारांच्या घराला असलेल्या मागील दरवाजाच्या कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. या २ लाख ६३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला. चोरट्यांनी कांगोणीच्या सचिन अण्णासाहेब कोकाटे यांच्या घरातही उचकापाचक करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, वडाळा बहिरोबा इथं झालेल्या चोरीमध्ये १ लाख ९८ हजार रुपयांची सोन्याची पोत, मंगळसूत्र, नेकलेस, मनी, झुबे, टॉप्स, फुले, अंगठी, नथी कुडके आदी सोन्याच्या आभूषणांसह ६५ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी हिराबाई वसंत पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या चोरीची माहिती समजताच शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, प्रभारी पोलीस अधिकारी सपोनि विजय माळी यांनी घटनास्थळी भेट दिली.