अहिल्यानगर'त्यांच्या' मागं शनिदेवाची साडेसाती नक्की लागणार ; खोटी शपथ घेणाऱ्यांना आता 'त्यांची'...

‘त्यांच्या’ मागं शनिदेवाची साडेसाती नक्की लागणार ; खोटी शपथ घेणाऱ्यांना आता ‘त्यांची’ नियतीच उत्तर देणार : विठ्ठलराव लंघे यांचा माजी आमदार मुरकुटेंवर घणाघात…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

शनिदेवाची महिमा सर्वश्रृत आहे. ज्या देवानं कोणालाच सोडलं नाही, त्या शनिदेवाची खोटी शपथ घेणाऱ्या मतलबी उमेदवाराच्या मागं भविष्यात नक्कीच शनिदेवाची साडेसाती लागणार आहे. स्वतःचं राजकारण जीवंत ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या या माणसाची नियतीच आता भविष्यात उत्तर त्यांना देणार आहे, असा घणाघात महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी केलाय.

नेवासे तालुक्यातल्या पुनतगाव, पाचेगाव, शिरसगाव, खेडले परमानंद, करजगाव आदी गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारफेरीदरम्यान लंघे बोलत होते. ते म्हणाले, ‘नेवासे तालुक्यातल्या माता भगिणी, सामान्य मतदार, शेतकरी, कामगार, युवा वर्ग या सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे प्रचार सभेचा शुभारंभ करताना जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यामुळे राज्यभरात महायुतीबद्दल विश्वासार्हता वाढली आहे.

स्वतंत्र नेवासे मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघात प्रस्थापितांशी कोणी कोणी सेटलमेंट केली, पडद्याआड कोणी हात मिळवणी केली, प्रस्थापितांना कुठल्याच प्रकारचा विरोध न करण्याची ‘कमिटमेंट’ कोणी कोणाला दिली, हे संपूर्ण नेवासाच्या जनतेला चांगलंच माहित आहे. शनिशिंगणापूरचे देवस्थान स्वतःच्या पक्षाकडे ठेवण्यात जे असमर्थ राहिले, आमदार झाल्यानंतर ज्यांनी या तालुक्यातले सर्वच कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले, ते आता काही भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा केसानं गळा कापण्याचा विचार करत आहेत. मात्र सामान्य जनता यावेळी फसणार नाही. 

शनिदेव हे नवग्रहातली सर्वात प्रभावी अशी देवता आहे. शनिदेवाच्या साडेसातीतून अक्षरशः ब्रह्मदेव, शिवशंकर यांचीदेखील सुटका झाली नाही. तिथं शनिदेवाची खोटी शपथ घेणारे हे ‘किस खेत की मुली है’, असा सवालही लंघे यांनी यावेळी उपस्थित केला.

लंघे यांना ‘पेशवें’ची खंबीर साथ…!

या प्रचार फेरीदरम्यान तालुक्यातले युवक, ज्येष्ठ मतदार, शेतकरी, कामगार, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गात समाधानाचं वातावरण असून त्याचा फायदा लंघे यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

माजी खासदार स्व. तुकाराम गडाख यांचे आणि लंघे कुटुंबियांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे लंघे यांच्या या प्रचारफेरीत माजी खासदार स्वर्गीय तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख (पेशवे) यांची लंघे यांना खंबीर साथ मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या