अहिल्यानगरनगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी ; तिसऱ्या टप्प्यातल्या प्रस्तावाला डी. आय....

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी ; तिसऱ्या टप्प्यातल्या प्रस्तावाला डी. आय. सी. जी. सी.ची मान्यता ; ठेवीदारांना 63 कोटी लवकरच मिळणार…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर

नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र १७ हजार ४२४ ठेवीदारांना ६३ कोटी रुपये परत करण्याच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रस्तावास डी आय सी जी सी ने मान्यता दिली असून ही रक्कम लवकरच केवायसी कागदपत्रांची पूर्तता व क्लेम फॉर्म भरुन दिलेल्या पात्र ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे , अशी माहिती बँकेचे अवसायक तथा एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांनी दिलीय.

दहा महिन्यांपूर्वी बँकेच्या अवसायक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गायकवाड यांनी बँकेच्या दैनंदिन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने भाडेतत्त्वावर कार्यालय असलेल्या १८ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या दृष्टीने डीआयसीजीसीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ५ लाखांच्या आतील पात्र ठेवीदारांचे मार्च २०२२ मध्ये पहील्या क्लेमचे रु. १८१.७१ कोटी, जून २०२२ मध्ये दुसऱ्या क्लेमचे रु ११३.१४ कोटी असे एकूण रु २९४.८५ कोटी ठेवी परत करण्यात आल्या आहेत.

थकीत कर्ज वसुलीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरु करण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये थकीत कर्जापैकी ४०.३२ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे.
उर्वरित थकीत कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु असून त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं पोलीस प्रशासन आणि न्यायालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

थकीत कर्जदारांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपल्या थकीत कर्जाची रक्कम लवकरात लवकर भरुन बँक प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत करण्यात बँक प्रशासन कटिबद्ध असून ज्या ठेवीदारांनी अद्याप आपले केवायसी कागदपत्रं आणि क्लेम फॉर्म भरुन दिलेले नाहीत त्यांनी तात्काळ नजिकच्या शाखेत ते जमा करावेत, असं आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या