रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
नगर पारनेर विधानसभा मतदारसंघात काल (दि. १७) अकल्पनीय असा राजकीय चमत्कार मतदारांना पाहायला मिळाला. या मतदारसंघात माजी आमदार विजय औटी, अपक्ष उमेदवार विजय औटी, काशिनाथ दाते, संदेश कार्ले आणि इतरांमध्ये स्पर्धा आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा चांगलाच उडाला आहे. अशातच काल (दि. १७) अनपेक्षित आणि अकल्पनीय असा राजकीय चमत्कार या मतदारसंघातल्या मतदारांनी पाहिला.
काल (दि. १७) सकाळी दहाच्या सुमारास पारनेर तालुक्यातल्या भाळवणीच्या बाजारतळावर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होती. तत्पूर्वी पारनेरच्या हिंदवी चौकात नगराध्यक्ष विजय औटी यांच्या समर्थकांची नगर दक्षिणेचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली.
या सभेत अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले स्वतः विजय औटी यांनाही भावना अनावर झाल्या.
या सभेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी बोलताना सांगितलं की विजय आवटे यांच्या एकाही कार्यकर्त्याला वारं सोडणार नाही त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
संध्याकाळी विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयासंदर्भात ‘रोखठोक’शी सविस्तरपणे भाष्य केलं.त्यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील यासंदर्भात त्यांच्या भावना व्यक्त केल्या.