Uncategorizedनेवाशाचं ठरलं बरं का...! गडाख आणि शिंदे यांच्यातच होणार 'कांटे की टक्कर'...!

नेवाशाचं ठरलं बरं का…! गडाख आणि शिंदे यांच्यातच होणार ‘कांटे की टक्कर’…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

माजी मंत्री आणि स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचा उद्या (दि. २४) सकाळी साडेनऊच्या सुमारास सोनईतल्या मुळा पब्लिक स्कूल इथं मेळावा होणार आहे. ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र राजकीय योगायोग म्हणा किंवा दुसरं काहीही म्हणा. गडाखांच्या या मेळाव्याच्या पूर्वसंध्येलाच (दि‌. २३) आमच्याकडे (रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर) एक बातमी येऊन धडकलीय. स्वतंत्र विधानसभा नेवासा मतदार संघ हा शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात येणार असल्याची ही बातमी आहे. शिंदे गटाकडून प्रसिद्ध उद्योजक प्रभाकर काका शिंदे हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे स्वतंत्र नेवासा मतदारसंघात गडाख

विरुद्ध शिंदे

अशी ‘कांटे की टक्कर’ होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे मशाल हाती घेणार की अपक्ष लढणार, हे उद्याच्या (दि. २४) मेळाव्यात स्पष्ट होणार आहे. मात्र त्यांच्या विरोधात धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर प्रभाकर काका शिंदे हे लढणार असल्याचं नवीदिल्लीतल्या विश्वसनीय सूत्रांमार्फत समजलं आहे.

या सूत्रांच्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (दि. २३) गुवाहाटी इथं कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. गुवाहाटीतून ते रत्नागिरीत निलेश राणे यांच्या शिवसेना शिंदे गटातल्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे हे नवीदिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे देण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

नेवाशात होणार ‘हाय व्होल्टेज ड्रामा’…!

यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी ‘कांटे की टक्कर’ आणि ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळणार आहे. स्वतंत्र नेवासे विधानसभा मतदारसंघदेखील याला अपवाद नाही. या मतदारसंघात प्रस्थापितांशी दमदारपणे लढणारा आणि निवडणुकीनंतरदेखील कुठलीही राजकीय तडजोड न करणारा उमेदवार माजी खासदार स्वर्गीय तुकाराम गडाख यांचा अपवाद वगळता मिळालेला नव्हता. मात्र यावेळी हा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे गेला तर प्रभाकर काका शिंदे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात खमक्या स्वभावाचा उमेदवार मिळणार असून ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या