आगामी विधानसभा निवडणुकीत आजी माजी लोकप्रतिनिधींना कुठल्याही परिस्थीत घरी बसविणारच, अशी भिष्मप्रतिज्ञा आम्ही करत आहोत, असं वक्तव्य करत नेवासे तालुक्यातल्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या (माजी मंत्री, विद्यमान आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे) ‘घर वापसी’ची वेळ आली आहे, असं प्रतिपादन लोकशक्ती आघाडीचे समन्वयक सुरेश शेटे पाटील यांनी केलंय.
नेवासे तालुक्यातल्या नागरिकांशी संवाद करताना शेटे पाटील यांनी मोठ्या आत्मविश्वासानं हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ‘जनताच त्या दोघांना यावेळी घरी बसवणार आहे.
नेवासे तालुक्याचे हे दोन्ही आजी माजी लोकप्रतिनिधी हे एकमेकांचे संगोपन करताहेत, असंही शेटे पाटील म्हणाले.
संभाजी माळवदे म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांत या दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकांशी छुपा संबंध ठेवत तालुक्यातील जनतेला वेड्यात काढून तालुक्यातील जनतेच्या विकासाचा निधी हडप केला आहे. या दोघांची लढाई ही नुरा कुस्ती असून या कुस्तीला आता जनता दाद देणार नाही.
मॅच फिक्सिंग करुन जनतेला वेड्यात काढण्याचे आता या दोघांनीही थांबवावं’.
संदीप अलवणे म्हणाले, ‘येथून पुढे कितीही मॅच फिक्सिंग करा. पन फायनलमधे लोकशक्ती आघाडीशी तुमची लढाई निश्चित असून लोकशक्ती बाजी मारेल आणि गोल्ड मेडल मिळवेल. या गोल्ड मेडलची माळ जणताच लोकशक्ती आघाडीच्या गळ्यात टाकण्यासाठी उत्सुक आहे.
संतोष काळे म्हणाले, ‘अनेक निवडणुकीत तडजोडी करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या आजी माजी लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रकोपाला निश्चित सामोरं जावं लागणार आहे. लोकशक्ती आघाडीच्या माध्यमातून सक्षम पर्याय आज जनतेला मिळाला आहे. यावेळी संपूर्ण तालुकाभर फिरून यांचं पितळ आम्ही उघडं पाडणार आहोत’.
नेवासे तालुका दौऱ्यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, सादीक शिलेदार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे, गणपत मोरे, विकास चव्हाण, भैरवनाथ भारस्कर आदींसह लोकशक्ती आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.