अहिल्यानगरनेवाशाच्या राजकारणात लवकरच नवा 'ट्विस्ट'...! अपक्ष उमेदवाराचा महायुतीच्या विठ्ठलराव लंघेंना मिळणार...

नेवाशाच्या राजकारणात लवकरच नवा ‘ट्विस्ट’…! अपक्ष उमेदवाराचा महायुतीच्या विठ्ठलराव लंघेंना मिळणार पाठिंबा? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार घोषणा…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

राजकारणात नक्की कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू, हे समजणं सामान्यांच्या बौद्धिक क्षमतेपलीकडचं असतं. कारण राजकारणात हल्ली काहीही होऊ शकतं. सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं जोमात व्हायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या हाती (रोखठोक 24 न्युज नेटवर्क) एक धक्कादायक परंतू खात्रीशीर बातमी आली आहे. आता त्या बातमीवर विश्वास ठेवायचा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु ही बातमी लवकरच सत्यात उतरणार आहे, हे मात्र नक्की.

महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे

यांच्या प्रचाराचा धुरळा सध्या गगनाला भिडला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारानंदेखील प्रचारात रंगत आली आहे. लंघे यांनी वैयक्तिक भेटीगाठी, प्रचार दौरे, ठिकठिकाणी जाहीर सभा यावर जोर दिला आहे.

दरम्यान, लंघे यांची राजकीय ताकद आणखी वाढणार आहे. 221 स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार लंघे यांना पाठिंबा देणार असल्याची ही बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नेवाशामध्ये मोठी राजकीय सभा लवकरच होणार असून या सभेत संबंधित अपक्ष उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांना पाठिंबा देणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय.

… तर तिरंगी नव्हे नेवाशात होणार दुरंगी लढत…!

महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांना अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा मिळाला तर स्वतंत्र नेवासे विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात सध्या तीन उमेदवार आमने-सामने लढत आहेत. मात्र अपक्ष उमेदवाराचा लंघे यांना पाठिंबा मिळाल्यास या मतदारसंघात तिरंगीऐवजी दुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेवासा दौऱ्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या