अहिल्यानगरनेवाशातलं राजकीय वातावरण खरचं फिरलंय...! विठ्ठलराव लंघेंनी 'सोनईकर' आणि 'देवगावकरां'ना चांगलंच घेरलंय...!

नेवाशातलं राजकीय वातावरण खरचं फिरलंय…! विठ्ठलराव लंघेंनी ‘सोनईकर’ आणि ‘देवगावकरां’ना चांगलंच घेरलंय…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

स्वतंत्र २२१ नेवासा विधानसभा मतदारसंघात ‘सोनईकरां’चं स्वार्थी राजकारण असून सत्तेचा वापर विरोधकांची जिरविण्यासाठीच सोनईकरां’नी केला, असा आरोप महायुतीच्या आजपर्यंतच्या प्रत्येक प्रचार सभेत केला गेला. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेनंतर नेवाशातलं राजकीय वातावरण खरचं फिरलं आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघेंनी ‘सोनईकर’ आणि ‘देवगावकरां’ना चांगलंच घेरलं असल्याचं चित्र या मतदारसंघात पहायला मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी नेवाशातले सत्ताधारी असलेल्या ‘सोनईकरां’च्या कार्यपद्धतीचा नेवासा फाटा परिसरातल्या नामदेनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत चांगलाच खरपूस समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडलं नाही. ‘आम्ही घेणारे नाही. तर देणारे आहोत. जे घेणारे असतात, ते देवालाही सोडत नाहीत. ‘त्यांचे’ मालकच असे तर ‘त्यांचे’ आमदार कसे’, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांनी दोघांनाही यथेच्छ झोडपून काढलं.

पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा कारखाना ऊसाला ३ हजार २०० रुपये भाव देत असताना सोनईचा मुळा कारखाना फक्त २ हजार ७०० रुपये भाव देतो आहे. ५०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा असून या घोटाळ्याची आम्ही सखोल चौकशी करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी या सभेत बोलताना दिली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे

यांची नेवासे तालुक्यातल्या घोडेगाव आणि अन्य ठिकाणी सभा झाली. त्या सभेत खासदार शिंदे यांनीही ‘सोनईकरां’च्या मनमानी कार्यपद्धतीवर परखड भाष्य केलं. या तालुक्यातल्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी रोजगार निर्मितीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. सत्तेच्या माध्यमातून विकास करण्याऐवजी विरोधकांच्या ऊसाला योग्य भाव दिला नाही. विरोधकांमधील तरुणांवर खोट्या केसेस केल्या. ‘सोनईकरां’च्या या दहशतीचा नायनाट करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन खासदार शिंदे यांनी या सभेत बोलताना केलं.

दरम्यान, ‘देवगावकरां’ची दुसऱ्या राजकीय पक्षाच्या एबी फॉर्मसह दाखल करण्यात आलेली उमेदवारी ही खरं तर ‘सोनईकरां’चीच करामत होती, अशी उघड चर्चा या मतदारसंघात ऐकायला मिळत आहे. ‘सेम डे’ला म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक तास आधी तथाकथित जय हरी असलेल्या ‘देवगावकरां’ना बच्चू कडू यांच्या पक्षाकडून एबी फॉर्म दिला जातो, हा योगायोग नाही तर ‘सोनईकरां’नी संगनमताने ठरवून रचलेला हा कपटी डाव असल्याचं नेवाशाच्या जनतेला कळून चुकलं आहे.

जे स्वतःच्याच पक्षाचे झाले नाहीत, नेते आणि कार्यकर्त्यांचे झाले नाहीत, ते ‘देवगावकर’ नेवाशाच्या सामान्य जनतेचे काय होणार, असा सवाल या मतदारसंघात सध्या उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता विठ्ठलराव लंघे आणि ‘देवगावकर’ हे दोघे एकाच पक्षाचे (भाजप) कार्यकर्ते होते. या दोघांसाठीही भारतीय जनता पक्षाचे आदेश बंधनकारक होते. मात्र पक्षाचा आदेश येताच लंघे यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याऐवजी शिवसेनेच्या (शिंदे गट) धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. ‘देवगावकरां’नी मात्र पक्षाची, पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांची अजिबात पर्वा केली नाही.

 बारकाईनं विचार केल्यास ‘देवगावकर’ आणि ‘सोनईकरां’चं तसं जुनंच राजकीय नातं आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत ‘देवगावकर’ हे ‘सोनईकरां’च्याच अधिपत्याखाली कार्यरत होते. मात्र ज्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हाताला धरुन भाजपमध्ये आलेल्या आणि फक्त नावालाच माळकरी असलेल्या, शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर हात ठेवून खोटी शपथ वाहणाऱ्या ‘देवगावकरां’नी पालकमंत्री विखे यांच्यासह भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना लाथडल्या. त्यामुळे जे देवगावकर एका पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे झाले नाहीत, ते सामान्य नेवासकरांचे काय होणार, असा प्रश्न ध्यानात घेऊन नेवाशाच्या सूज्ञ मतदारांनी योग्य निर्णय घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावं, असं आवाहन शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित दादा गट) आणि आरपीआय या संयुक्त महायुतीच्यावतीनं करण्यात आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या