अहिल्यानगरनेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या गाडीला घातपात...!

नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या गाडीला घातपात…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

काल (दि. ९) रात्री मुंबईवरुन पक्षाची मिटिंग करुन परतत असताना सुपा (ता. पारनेर) घाटामध्ये एका अज्ञात वाहनाकडून पुण्यापासून पाठलाग करत ऋषिकेश शेटे पाटील यांच्या गाडीला दोन वेळा धडक देऊन सुपा घाटाजवळ ती पलटी करण्यात आली. ऋषिकेश शेटे पाटील यांचा अंगरक्षक सोबत नसल्याचा फायदा घेत सुपा घाटाजवळ रात्री 11 वाजता गाडीचा घात पात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शेटे पाटील यांच्या गाडीनं दोन पलट्या खाल्ल्या. गाडी भररस्त्यावर कट मारुन पलटी झाली. ऋषिकेश शेटे पाटील पुण्यामध्ये काही कामानिमित्त उतरल्यामुळे आणि तेथून ते पुन्हा मुंबईला गेल्यानं सुदैवानं त्यांना काहीही झालं नाही.

दरम्यान, ऋषिकेश शेटे पाटील यांचे सहकारी आणि ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झालीय. या अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या संदर्भात गाडीचे चालक यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दिली केली आहे.

यापूर्वीही ऋषिकेश शेटे पाटील यांना दोन वेळा अशाच प्रकारचा घातपात करण्याचा प्रयत्न झालेला आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना विरोधकांकडून असा नीच पातळीवरचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे.

असल्या भ्याड हल्ल्यानं काहीच फरक पडणार नाही : ऋषिकेश शेटे पाटील…!

या घातापातासंदर्भात ऋषिकेश शेटे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘या हल्ल्यात कोणाचा हात आहे, हे पोलीस तपासाअंती समोर येईलच. यापूर्वीही अनेकदा मला संपविण्याचा प्रयत्न केला गेला. पण अशा भ्याड हल्ल्यांना मी आणि माझे सहकारी अजिबात भीक घालणार नाहीत. असल्या भ्याड हल्ल्यानं काहीच फरक पडणार नाही’.

आणखी महत्वाच्या बातम्या