बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे, ही बाब आपल्या देशातल्या प्रत्येकाला माहित आहे. असं असताना पाकिस्तानला शस्त्र खरेदीसाठी मदत करणाऱ्या चीन या देशाचा चायना माल भारतीय बाजारपेठेत येतोच कसा? आपल्या देशाचा गुप्तचर विभाग नक्की काय करतो आहे, हा विभाग झोपलाय का, असे प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक जागरुक भारतीय नागरिकानं विचारायलाच हवेत.
चीनने पाकिस्तानला लष्करी आणि औद्योगिक संकुल तयार करण्यास मदत केलेली आहे. पाकिस्तान हा चीनी शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. एरोस्पेस हे चीन-पाक संरक्षण संबंधांचे प्रमुख घटक आहे. पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स (पीएसी) स्थापन करण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत केली.
अशी परिस्थिती असताना मकर संक्रातीला भारतातल्या अनेक शहरांत सर्वांसाठी घातक असलेला चायना मांजा न चुकता येतो. दिवाळीला स्वस्तातल्या आकर्षक इलेक्ट्रॉनिक पणत्या, विद्युत माळा आणि पाण्यावरचे दिवे भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असतात. दरवर्षी हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सरकारकडे मागणी करतात, की चायना मांजावर बंदी आणा. पण आंधळं आणि बहिरं झालेलं केंद्र सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही.
एकीकडे हिंदुत्वाचा डांगोरा पिटवायचा आणि दुसरीकडे मात्र आपल्या शत्रुराष्ट्राला शस्त्र पुरवण्यासाठी मदत करणाऱ्या चीन देशातल्या स्वस्त वस्तूंना भारतीय बाजारपेठ उपलब्ध करुन द्यायची, असं दुटप्पी धोरण सध्याचे सत्ताधारी भाजप सरकार आखत असल्याबद्दल संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. यंदाच्या दिवाळीसाठी बाजारपेठेत कोणकोणत्या प्रकारचे दिवे विद्युत माळा आल्या आहेत, हे आता तुम्हीच या व्हिडिओद्वारे पहा आणि गंभीरपणे विचार करा.
… म्हणूनच पंतप्रधान मोदी पत्रकारांना टाळताहेत…!
गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशात भाजपप्रणित सरकार आहे. नरेंद्र मोदी दुसऱ्यांचा पंतप्रधान झाले आहेत. या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्यालयात किती वेळा पत्रकार परिषद घेतली, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. पत्रकार बांधव ‘अडचणीतले प्रश्न’ विचारुन भंडावून सोडतील, या भीतीने पंतप्रधान मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं बोललं जात आहे. भारत – पाकिस्तान संबंध, भारत – चीन संबंध, भारताचं दरडोई उत्पन्न, भारतातली वाढती गुन्हेगारी या संदर्भात पत्रकार नको नको ते प्रश्न विचारतील. कदाचित या भीतीमुळेच पंतप्रधान मोदी पत्रकारांना टाळत असावेत, असा अंदाज भारतीय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.