महाराष्ट्रपाच लाख मागितले एक लाख रुपये उकळले ; 'या' एपीआयविरुद्ध गुन्हा दाखल

पाच लाख मागितले एक लाख रुपये उकळले ; ‘या’ एपीआयविरुद्ध गुन्हा दाखल

Published on

spot_img

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये नील अहवाल पाठवण्यासाठी आणि भविष्यात कुठलीही तक्रार होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनं पाच लाखांची लाच मागून एक लाख रुपये घेतले. याप्रकरणी एसीबीने रचलेल्या सापळ्यात हे अधिकारी अडकले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चेतन चंद्रकांत थोरबोले (वय 36 वर्ष, पद – सहायक पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस चौकी, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर वर्ग-2) असं या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

तक्रारदार यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल होता. सदरचा अर्ज चौकशीकामी वाघोली पोलीस चौकीचे लोकसेवक सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्याकडे होता. तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे 5 लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचेविरूध्द दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी प्रथम 05 लाखाची मागणी करुन, तडजोडीअंती 1,00,000/- (एक लाख रुपये) रुपयांची लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला. 

अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र.
डॉ. शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक – श्रीमती. माधुरी भोसले, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पो. शि. प्रविण तावरे, महिला पोलीस शिपाई मीना कोळपे,
चालक पो. शि. पांडुरंग माळी, चालक स.पो.फौज. अविनाश चव्हाण, (ला.प्र.वि. पुणे) यांनी ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या