रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
पंचगंगा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा प्रभाकर काका शिंदे
यांनी ज्यांच्यासाठी पाच – दहा कोटी रुपये खर्च करुन ज्यांना आमदार केलं, त्यांनीच प्रभाकर काका शिंदे यांचं तिकीट कापलं. माणसानं स्वार्थी असावं पण इतकं स्वार्थी नसावं, अशी तळमळीची भावना व्यक्त करत नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
यांच्याबद्दल काल (दि. ४) मोठा गौप्यस्फोट केला आहे. शेटे पाटील यांनी यामध्ये अनेक मुद्द्यांना स्पर्श केलाय. काल अर्थात दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर संध्याकाळी शेटे पाटील यांनी त्यांच्या हितचिंतकांची माफी मागत सोशल मिडियावर त्यांची भावना व्यक्त केली. काय म्हणाले, ऋषिकेश शेटे पाटील हे तुम्हीच आता पहा आणि ऐका.