आजारी असल्याने डॉक्टर कुटे याच्याकडे उपचारासाठी गेलेल्या लॉ कॉलेजच्या मुलींवर अनैसर्गिक कृत्य करून जो अत्याचार केला, त्या घटनेला तब्बल 15 ते 20 दिवस उलटूनही त्या आरोपी डॉक्टर रविंद्र कुटे याला पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नसून त्याला तात्काळ अटक करावी. त्या डॉक्टर कुटे याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत) गुन्हा दाखल व्हावा. वैद्यकीय पेशाला कलंक असलेल्या आरोपी डॉक्टर रवींद्र कुटे याच्यावर त्याच्या गैरकृत्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने योग्य ती कारवाई न करता त्याउलट त्याला व त्याच्या दुष्क्रुत्याला पाठिंबा देऊन पिडीत मुलीला व तिच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर लढा उभारणाऱ्या मागासवर्गीय व इतर सर्व समाजबांधवांच्या आंदोलनाविरूद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनने निवेदनाद्वारे व वृत्तपत्राद्वारे खोटे आरोप केले.
मागासवर्गीय बांधवांसह आंदोलकांच्या भावना दुखावल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर अब्रु नुकसान भरपाईनुसार गुन्हा दाखल करावा.
दरम्यान, या मागणीसाठी दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी शांततेच्या मार्गाने व प्रशासनाला पूर्व सूचना देऊनही रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे, तो गुन्हा मागे घेण्यात यावा. तसेच जर डॉक्टर रविंद्र कुटेला लवकरात लवकर अटक न झाल्यास व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास *मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी पुतळा समोर मेन रोड श्रीरामपूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी बहुजन टायगर फोर्सच्यावतीनं देण्यात आला.
या निवेदनाच्या प्रती श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मुख्याधिकारी नगरपरिषद श्रीरामपूर, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीरामपूर, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आल्या आहेत.