अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरात असलेल्या कुटे हॉस्पिटलमध्ये दि. 4 ऑगस्ट रोजी उपचारासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग घडला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर रविंद्र कुटे यानं तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर डॉक्टर कुटे फरार झाला आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा आणि डॉक्टर कुटेची सनद रद्द व्हावी, डॉक्टर कुटेला लवकरात लवकर अटक करावी या मागण्यांसाठी एकलव्य संघटनेच्यावतीने 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात एकलव्य संघटनेचे भाऊसाहेब सुरसे, लक्ष्मण साठे, कृष्णा बर्डे आणि ज्ञानेश्वर बर्डे यांनी श्रीरामपूरच्या डी वाय एस पी कार्यालयासह शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे, की डॉक्टर कुटे हा फरार झाला असून तो बाहेर राहून पुरावा नष्ट करू शकतो. पिडित विद्यार्थिनीच्या कुटुंबावर तो दबाव आणू शकतो. डॉक्टर कुटे याच्यापासून पीडित विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
डॉक्टर कुटे हॉस्पिटलमध्ये यापूर्वी चुकीच्या उपचारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. डॉक्टर कुटे याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याचा पाठीराखा कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.
डॉक्टर कुटे हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. बलात्कारी डॉक्टर कुठे याच्या दवाखान्याची नोंदणी आणि डॉक्टर कुटेची सनद रद्द व्हावी आदी मागण्यासाठी 15 ऑगस्टपासून श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.