अहिल्यानगरबलात्कारी फरार डॉक्टर रविंद्र कुटेच्या श्रीरामपूर पोलीस कधी आवळणार मुसक्या?

बलात्कारी फरार डॉक्टर रविंद्र कुटेच्या श्रीरामपूर पोलीस कधी आवळणार मुसक्या?

Published on

spot_img

एक वचनी, एक पत्नी व्रताचं तंतोतंत पालन करणाऱ्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या नावानं राज्यात आणि देशात प्रसिद्ध असलेल्या श्रीरामपुरात वैद्यकीय तपासणीला आलेल्या एका विद्यार्थिनीवर रविंद्र कुटे नावाच्या डॉक्टरनं बलात्कार केलाय. घटनेनंतर हा बलात्कारी डॉक्टर फरार झाला आहे. श्रीरामपूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी या फरार डॉक्टर कुटेच्या मुसक्या श्रीरामपूर पोलीस कधी आवळणार, हाच खरा प्रश्न आहे.

श्रीरामपूर शहरात वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर या डॉक्टरनं बलात्कार केल्यामुळे रुग्णांसह नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

याप्रकरणी राहाता तालुक्यातल्या पिडित विद्यार्थीनीने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्या फिर्यादीनुसार डॉक्टर रविंन्द्र कुटे व रुग्णालयातली एक महिला कर्मचारी या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ७४, ११५ (२), ३५ २, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात देण्यात आलेल्या फिर्यादीत पिडीतेनं म्हटलं आहे की, मुलींच्या वसतिगृहावर असतांना आजारी पडल्याने रेक्टर आणि मैत्रीण अशा आम्ही तिघी डॉ. कुटे हॉस्पिटल इथं गेलो. तिथं ड्युटीवर असलेल्या कर्मचारी महिलेनं तरुणीला ओपीडीत नेलं. डॉ. रविंन्द्र कुटे तिथं आला, त्यानं विचारपूस केली आणि पिडित विद्यार्थिनीला झोपायला सांगितलं.

डॉ. कुटे यानं तपासतांना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन लैंगिक अत्याचार केला. तेव्हा मैत्रीण व रेक्टर मदतीला आल्या असता तेथील कर्मचारी महिलेसह डॉक्टर कुटेने शिवीगाळ केली आणि झाडूने मारलं. यावेळी पिडिता आणि तिच्याबरोबर असलेल्या दोघी प्रचंड घाबरुन गेल्या.

दरम्यान, याप्रकरणी आमच्या प्रतिनिधीनं पोनि. नितिन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. कुटे याच्याविरुद्ध जबरी संभोगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मगरे हे आरोपीचा शोध घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

नगर शहरातल्या छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या एका हॉस्पिटलमधील आयसीयुतल्या रुग्णाला डॉक्टरनं मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता श्रीरामपूर शहरातल्या नेवाशाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या