रोखठोक 24 न्यूज नेटवर्क
पुणे / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाचं तब्बल 25 दिवस आधी ‘प्लॅनिंग’ करण्यात आलं होतं. या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींना पार्सलद्वारे पिस्तूल सोपविण्यात आलं होतं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी आरोपींना ॲडव्हान्स पेमेंटदेखील देण्यात आलं होतं. सिद्दिकी यांच्या हत्येच्या गटात बिश्नोई गॅंगचाच हात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
बिश्नोई गॅंगचा कर्नेलसिंग हा बाबा सिद्दिकी हत्येच्या कटात प्रमुख भूमिकेत होता. कर्नेलसिंग याला 2019 मध्ये हत्येच्या कटात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. जेलमध्ये असताना बिश्नोई गॅंगसोबत त्याने संपर्क केला होता. बाबा सिद्दिकींच्या त्याच्या कटात सहभागी असलेले तिघेजण पंजाबच्या जेलमध्ये एकत्र असताना भेटले होते. त्या जेलमध्ये आधीपासूनच बिश्नोई गॅंगचा एक सदस्य होता. हे तिघे त्याच्या संपर्कात आले होते, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.