बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
रोखठोक 24 न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगरच्या शेअर मार्केटमध्ये अनेकांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गंडा घातलेला नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या दरंदलेगल्लीत राहत असलेला शेअर मार्केटचा ‘मास्टर माईंड’ अमोल उर्फ तुका शंकर दरंदले याला अखेर बंगळुरु (कर्नाटक) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तुका हा गोव्याहून बंगळुरु इथं आला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे बंगळुरु पोलिसांनी सापळा रचत तुका याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
छत्रपती संभाजीनगर, चंदीगड आणि बंगळुरु अशा विविध ठिकाणी तुका याने अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेतले. शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त परतावा मिळवून देतो, असं आमिष तुका यानं गुंतवणूकदारांना दाखवलं होतं. सोनई पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘तुका’च्या वडिलांनी बदलवली स्वतःची भूमिका…!
शेअर मार्केटमध्ये माझ्या मुलाचा काही संबंध नाही, या ज्या बातम्या सोशल मिडियावर येत आहेत, त्या खोडसाळपणातून देण्यात येत आहेत, शेअर मार्केटच्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही, असं अनेकांना सांगत वायरमन अशी ओळख असलेले तुकाचे वडील छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना आता फोन करुन सांगत आहेत, की तुमची जी काही आर्थिक फसवणूक झाली असेल, त्याबद्दल तुम्ही ‘लिगल ॲक्शन’ घ्या. अर्थात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज द्या. दरम्यान, बंगळुरु पोलिसांनी तुकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनी जी भूमिका बदलवली, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.