अहिल्यानगर'बुलडोझर बाबा'चा महाराष्ट्रात झंझावाती दौरा ; २५ पेक्षा जास्त प्रचार सभा होणार...!

‘बुलडोझर बाबा’चा महाराष्ट्रात झंझावाती दौरा ; २५ पेक्षा जास्त प्रचार सभा होणार…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे ‘ब्रँड अँबेसिडर’ आणि ‘फायर ब्रँड’ नेते असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (बुलडोझर बाबा) यांचा झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. या दौऱ्यात योगी आदित्यनाथ

यांच्या तब्बल 25 पेक्षा जास्त प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा आवाज बुलंद होणार आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ ही टॅगलाईन घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा विचार राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरविणार असून विभाजित घटकांचं एकत्रीकरण करण्याचा या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे.

उत्तरप्रदेश राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेच्या माध्यमातून घेतलेले महत्त्वाचे निर्णय, सर्वसामान्य जनतेसाठी लागू केलेल्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजना, हिंदुत्वाच्या आड येणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींना ‘बुलडोझर’च्या माध्यमातून ठेचून काढण्याचे योगी आदित्यनाथ

यांनी केलेले प्रयत्न या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांची चर्चा जाहीर प्रचाराच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान, भाजपच्या प्रचार सभांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांच्यापेक्षा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जास्तीत जास्त मागणी आहे. त्यांच्या सभांची तारीख मिळावी, यासाठी संभाव्य उमेदवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण पुन्हा एकदा चांगलं ढवळून निघणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचे

नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करणार आहेत. या आरोप प्रत्यारोपांनी सामान्य जनतेचे मनोरंजन होणार असलं तरी मुख्य प्रश्नांची चर्चा या प्रचार सभांच्या दरम्यान करण्यात येईल का, हाच खरा प्रश्न आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या