बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा (दि. ४) अंतिम दिवस आहे. आजच्या दिवशी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता. मात्र पक्षश्रेष्ठींशी झालेल्या सविस्तर चर्चेअंती शेटे पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे
यांना खंबीर साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढच्या राजकीय वाटचालीत नेवासा भाजपची सर्व निर्णायक शक्ती ऋषिकेश शेटे पाटील यांच्याकडे आली असून या मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीनं नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख
यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. गडाख यांचा सामना महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्याशी होणार आहे.
दुसरीकडे ज्या भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी गडाखांसमोर मोठं आव्हान उभं करत युवा कार्यकर्त्यांसह वयोवृद्ध नेवासकरांची प्रचंड मोठी ताकद उभी केली आहे. त्या ताकदीच्या बळावर महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांचं पारडं सध्या तरी जड झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, विद्यमान आमदार शंकरराव गडाख हेदेखील आज (दि. ४) त्यांच्या नेवासे शहरातल्या संपर्क कार्यालयात बसून होते. विधानसभा निवडणुकीसाठी भरण्यात आलेले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना गडाख हे कार्यकर्त्यांना देत होते. अवघ्या एक तासानंतर विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. वास्तविक पाहता स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात शंकरराव गडाख- विठ्ठलराव लंघे- बाळासाहेब मुरकुटे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून गडाख यांचा पराभव करणं लंघे यांना वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. अनेक संस्था, कारखाना, सोसायट्या आणि शनिशिंगणापूर देवस्थान अशी शक्ती स्थळं गडाख यांच्या ताब्यात असून हक्काच्या मतदारांचं मोठ्ठं ‘पॅकेज’ त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नेवासा विधानसभा मतदार संघातल्या या तिरंगी लढतीकडे संपूर्ण तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.