रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भिंगार या उपनगराला आतापर्यंतच्या अनेक लोकप्रतिनिधींनी केवळ गृहीत धरलं आहे. विशेष म्हणजे भिंगार मधून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य उमेदवाराला मिळालेलं आहे. परंतु तरीदेखील भिंगारला आजपर्यंत सावत्र भावाची वागणूक देण्यात आली. निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी क्वचितच भिंगारला येतात. मात्र या निवडणुकीत भिंगारकरांनी वेगळा निर्णय घेतलाय.
भिंगार शिवसेना शहर प्रमुख प्रतिक भंडारी यांनी या संदर्भात विधानसभा निवडणुकीतल्या सर्वच संभाव्य उमेदवार आणि निवडणूक निकालानंतर विजयी होणाऱ्या लोकप्रतिनिधीला एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. भंडारी यांनी दिलेला तो इशारा नक्की काय आहे, हे या व्हिडिओत तुम्हीच प्रत्यक्ष पहा.