वाचक मित्रांनो, तुम्ही यापूर्वी अनेक वेळा विविध वर्तमानपत्रांत अशा बातम्या नक्कीच वाचल्या असतील, की जुगार, मटका हे अवैध धंदे बंद करा. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की मटक्याचा धंदा कधीपासून अस्तित्वात आला? या धंद्याला मटका असं का म्हणतात? आजच्या या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत, ती वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मंडळी, मटक्याचा धंदा स्वातंत्र्यपूर्व काळातही होता बरं का! त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना अवघा १०० रुपये दरमहा पगार मिळत होता. तर त्यावेळच्या एका सरकारी अधिकाऱ्याचे पैसे एक दारुड्यानं चोरले आणि शंभर शंभर रुपयांच्या मटक्याच्या तीन चिठ्ठ्या घेतल्या. स्वतः रतन खत्री त्या धंद्यावर यायचा आणि ज्यांनी ज्यांनी मटका लावलाय, त्या सर्वांनाच पेमेंट करायचा.
शंभर शंभर रुपयांचा तीन वेळा मटका लावणारा (एक्का, दुर्री, तिर्री) तो जो दारुडा इसम होता, त्याला त्यावेळी तब्बल ४४ हजार रुपये मिळाले होते.
आता या धंद्याला मटका का म्हणतात, ते जाणून घ्या…!
एका अंधाऱ्या खोलीत शेकडो लोक जमा व्हायचे. त्या खोलीत एक मटका ठेवला जायचा. खोलीतल्या मटक्यात अनेक चिठ्ठ्या ठेवल्या जायच्या. रतन खत्री स्वतः येऊन त्या मटक्यातल्या चिठ्ठ्या काढून उपस्थित लोकांना पेमेंट द्यायचा. तर असा हा मटक्याच्या धंद्याचा आम्ही दिलेला खरा इतिहास तुम्हाला कसा वाटला, हे नक्की कळवा.