अहिल्यानगरमराठा समाजाला आरक्षण न दिल्यास त्याचे दुष्परिणाम सरकारला भोगावेच लागणार : सुरेश...

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास त्याचे दुष्परिणाम सरकारला भोगावेच लागणार : सुरेश शेटे पाटील यांचा इशारा

Published on

spot_img

मराठा समाज अजूनही शांत आहे. या समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर हा समाज प्रचंड आक्रमक होईल. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, यासाठी आतापर्यंत या समाजातल्या अनेकांच्या प्राणांची आहुती गेली आहे. अनेक आंदोलनं या मागणीसाठी करण्यात आली. मात्र सरकारला अद्यापही जाग यायला तयार नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागणार आहे. अन्यथा त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील, असा इशारा हॉटेल लिलियम पार्क उद्योग समुहाचे संस्थापक सुरेश शेटे पाटील यांनी रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी बोलताना दिला.

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, यासाठी नगरमध्ये काल (दि. 12) शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या शांतता रॅलीप्रसंगी शेटे पाटील बोलत होते. ते म्हणाले या सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये. आज लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. आज जरी तो शांततेत असला तरी कधीही मराठा समाजातील तरुण रुद्रावतार धारण करु शकतात. सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील.

आणखी महत्वाच्या बातम्या