महाराष्ट्रमराठ्यांची लेकरं मेली तरी सत्ताधाऱ्यांना काहीच देणं घेणं नाही... मतदान रुपी...

मराठ्यांची लेकरं मेली तरी सत्ताधाऱ्यांना काहीच देणं घेणं नाही… मतदान रुपी ताकद दाखवली नाही तर तुमच्या मुलांचे भवितव्य अंधारातच राहील : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा….!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

‘सरकारनं जाणूनबुजून मराठ्यांचा अपमान केला आहे. त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसींमध्ये 17 जातींचा समावेश केला. तुम्ही आता ठरवायचं आहे, आता जात मोठी करायची की तुमचा आमदार मोठा करायचा. त्यांना तुमचे लेकरं मेली तरी काही देणं घेणं नाही. सरकारनं मराठ्यांचे पोरं उन्हात टाकायचं ठरवल आहे. ही शेवटची लढाई असणार आहे. तुम्हाला मनात आणि मतात दोन्हीतही परिवर्तन करावं लागणार असल्याचं सांगत मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील

यांनी सांगितलं. मतदानरुपी ताकद दाखवली नाही तर तुमच्या मुलांचे भवितव्य अंधारात असेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

ते म्हणाले, ‘या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाकडे भावनिकेतेने पाहू नका, मराठा समाजाचे हित लक्षात घ्या. सरकारने मराठ्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केलं आहे. आता, विधानसभेच्या निवडणुकीत आपलं एकही मत वाया जाता कामा नये.

जरांगे पाटील यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपली भूमिका जाहीर केली. यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हटले की, ‘आमची मागणी पूर्ण झाली नाही. आरक्षणाबाबत निर्णय घेणं त्यांच्या हातात होतं त्यांनी तो निर्णय घेतला नाही. आता आम्ही मैदानात येत आहोत. मत देणं आमच्या हातात आहे. फडणवीस यांना मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी पुरेपुर मराठ्यांचा कार्यक्रम लावला तो यशस्वी पण झाला. शेतीपासून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा समाज एका अरिष्टात अडकला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्या मतदानाची ताकद दाखवा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.

आणखी महत्वाच्या बातम्या