अहिल्यानगर'मल्टीस्टेट'चा दरोडा भाग : ७ तब्बल ७ बोगस कंपन्यांचं संचालकपद भोगूनही...

‘मल्टीस्टेट’चा दरोडा भाग : ७ तब्बल ७ बोगस कंपन्यांचं संचालकपद भोगूनही तृप्त झाले नाहीत…! अखेर ‘भाग्य लक्ष्मी’ विकत घेतली आणि पळून गेले भारत बबन पुंड…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर

माणसाची हाव वाढत गेली, की त्याचा परिणाम काय होतो, हे पहायचं असेल तर भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन भारत बबन पुंड यांच्या मानसिकतेचा (मेंटॅलिटी) सखोल अभ्यास करावा लागणार आहे. सात सात बोगस कंपन्यांचं संचालकपद भोगूनही हा माणूस कधीच तृप्त झाला नाही. अखेर आठव्यांदा ‘भाग्य लक्ष्मी’ मल्टीस्टेटचं दीड कोटी रुपयांना लायसन्स विकत घेतलं, 56 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आणि अखेर भारत बबन पुंड यांच्यावर तोंड लपवून पळून जाण्याची नामुष्की आली.

भारत पुंड यांच्या नावावर ७ कंपन्या असून त्यांची नोंदणी आणि नियंत्रण केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत चालतं. पुंड यांची पत्नी अश्विनी भारत पुंड आणि सचिन दत्तात्रय विधाते या तिघांच्या नावावरसुद्धा कंपन्या दाखविण्यात आल्या आहेत. जनसामान्यांकडून ठेवींच्या रुपाने गोळा केलेला सगळा पैसा भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अडकला आहे. तब्बल 56 कोटी रुपयांचं ‘बॅलन्स शीट’ या मल्टीस्टेटचा असल्यास बोललं जात आहे.

भारत बबन पुंड हे दिनांक 16 मार्च 2018 रोजी प्युरिफिना वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक होते. पुंड हे दिनांक ५ ऑक्टोबर 2021 रोजी धनदाय अर्बन टाकळीभान निधी लिमिटेड या कंपनीचे संचालक होते. पुंड हे दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी धनदाय अर्बन घोडेगाव निधी लिमिटेड कंपनीचे संचालक होते.

भारत बबन पुंड हे दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी धनदाय अर्बन श्रीरामपूर निधी लिमिटेड कंपनीचे संचालक होते. पुंड हे दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी धनदाय अर्बन निधी लिमिटेड या कंपनीचे संचालक होते. पुंड हे दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी धनदाया निधी लिमिटेडचे संचालक होते.

 

हे सर्व वाचल्यानंतर भारत बबन पुंड यांनी शब्दांचा खेळ करत कशा पद्धतीने आणि कानात टोप्या घातल्या की लक्षात येईल. अनेक कंपन्यांचे संचालक पद भोगल्यानंतर भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचं लायसन्स विकत घेतलं आणि 56 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. हे करत असताना पुंड यांनी एक रुपयाचेदेखील कर्जवाटप केलेले नाही, ही मोठी धक्कादायक बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

दरम्यान, उद्या अर्थात दि. ४ सप्टेबर रोजी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे ठेवीदार नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांची भेट घेणार आहेत. 56 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा हा मुद्दा संसदेच्या सभागृहात उपस्थित करण्याचं साकडं खासदार लंके यांना घालण्यात येणार आहे. खासदार लकी यांनी आर्थिक फसवणुकीचा हा प्रश्न संस्थेच्या सभागृहात उपस्थित केल्यानंतर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या प्रश्नाला कशा पद्धतीने उत्तर देतात, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मित्रांनो, ही लेखमाला सुरु ठेवत असतानाच आम्ही आता परवापासून मल्टिसिटी निधी कंपनीचा ‘फर्जी वाडा’ एका वेगळ्या लेखमालेतून तुमच्यासमोर आणत आहोत. इथं तर इतका मोठा आर्थिक घोटाळा आहे, की ती स्वतंत्र लेखमाला वाचल्यानंतर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. फक्त एवढंच सांगत आहोत, की हा घोटाळा करणारा भारत बबन पुंड यांचाच ‘चालबाज’ गुरु आहे. तूर्तास इतकंच धन्यवाद.

आणखी महत्वाच्या बातम्या