गडचिरोलीमध्ये महसूल सप्ताह सुरू असतानाच वैयक्तिक वसुली जोरात सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे. एका कनिष्ठ अभियंत्याच्या लाचखोरीची चर्चा संपत नाही, तोच मंडल अधिकारी आणि तलाठ्याला सहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे.
मंडल अधिकारी व्यंकटेश सामय्या जल्लेवार आणि मंडल अधिकारी भूषण जवंजाळकर अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो. नि. शिवाजी राठोड, सहाय्यक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, किशोर जौंजारकर, अंमलदार प्रवीण जुमनाके आदींनी केली.
हावरटपणा संपतच नाही ‘या’ हरामखोरांचा…!
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणं चव्हाट्यावर येत आहेत. पहिल्यावर झालेली कारवाई पाहून दुसरा अजिबात सावध होत नाही उलट लाच घेण्यात कुत्र्यासारखं धावत पळत जातो. या हरामखोर लाचखोरांचा हावरटपणा काही केल्या संपत नाही, हेच महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे.