अहिल्यानगरमहायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यावरचं अहिल्यानगरचे प्रसिद्ध गायक अविनाश वाडकर यांनी संगीतबद्ध...

महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यावरचं अहिल्यानगरचे प्रसिद्ध गायक अविनाश वाडकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातलं गाणं तुम्ही ऐकलंय का?

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण असलेले, अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक पंडीत सुरेश वाडकर यांचे मानसपुत्र अविनाश वाडकर यांनी संगीतबद्ध केलेलं स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे

यांच्यावर अविनाश वाडकर यांनीच लिहिलेलं एक गाणं प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी गायलं आहे. या गाण्याचं लॉन्चिंग अर्थात लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेवासा फाटा परिसरातल्या नामदेवनगर भागात झालेल्या प्रचार सभेत पार पडला.

तुम्हा सर्वांना हे गाणं ऐकायला मिळावं, यासाठी आम्ही (रोखठोक 24 न्युज नेटवर्क अहिल्यानगर) मुद्दामहून या गाण्याची लिंक या बातमीत दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करुन या गाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अविनाश वाडकर हे अमृतवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात प्रभावी अशी कामगिरी करत आहेत.

महाराष्ट्र कलाभूषण, कलारत्न, समाजभूषण अशा 21 पुरस्कारांनी अविनाश वाडकर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. लग्न समारंभात अविनाश वाडकर आणि त्यांचे सहकारी मराठी आणि हिंदी गाण्यांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांची सेवा करत असतात. तुम्हाला जर वाडकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं गाणं ऐकायचं असेल तर लगेच या लिंकवर क्लिक करा.

आणखी महत्वाच्या बातम्या