अहिल्यानगरसोनई महावितरणचा ठेकेदार करतोय अरेरावी : शनिशिंगणापूरच्या राजेंद्र माळी यांची तक्रार

सोनई महावितरणचा ठेकेदार करतोय अरेरावी : शनिशिंगणापूरच्या राजेंद्र माळी यांची तक्रार

Published on

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनई महावितरणच्या ठेकेदाराकडून सर्वसामान्य ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानित करण्याचा प्रकार घडत आहे, अशी तक्रार शनिशिंगणापूरचे राजेंद्र माळी यांनी केली आहे.

दरम्यान, विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे ऊर्जा मंत्राकडे करण्यात आली आहे.

महावितरणच्या सोनई कार्यालयाअंतर्गत महावितरणचे ओल्ड शिफ्टिंग व इतर कामे सोनईतला एक ठेकेदार करत असून येथील बोल शिफ्टिंग व इतर कामे यांना विद्युत निरीक्षकाची मान्यता आहे की नाही हे गुलदस्यात असून ही कामे विद्युत निरीक्षक यांनी पाहणी केल्यानंतरच याचे बिले पास होणे आवश्यक असताना काही ठिकाणी विद्युत निरीक्षकांनी पाहणी न करता बिले काढली जात आहेत, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ज्या ठिकाणी होलसेलची आवश्यकता आहे, तेथे विद्युत निरीक्षकांनी पाहणी करूनच परवानगी देणे आवश्यक असताना काही ठिकाणी विद्युत निरीक्षकाची परवानगी न घेता ओल्ड शिफ्टिंगची कामे करण्यात आली असून त्या कामांची बिले कोणाच्या परवानगीने काढण्यात आली, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

सदरील ठेकेदार विद्युत ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरून राजकीय पुढाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत असून आमचं कुणीही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठे तक्रार करायची करा, असे बोलून सर्वसामान्य ग्राहकांना अपमानित करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

सदरील ठेकेदाराच्या घरी जेवढी कामं झाली आहेत, त्या सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे आहे. सदरील ठेकेदारानं जी कामे केली आहेत, या सर्व कामांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. बरीचशी कामं ही कुठल्याही चौकटीत बसत नसली तरी संबंधित ठेकेदाराकडून ही कामे करण्यात आली आहेत.

या कामांना विद्युत निरीक्षकाने परवानगी कोणत्या आधारावर दिली, याची संपूर्ण चौकशी होऊन सदरील ठेकेदाराला दंड ठोठावण्यात यावा व चालू असलेली कामे ही विद्युत निरीक्षकाने पाहणी करून मंजुरी दिलेली आहेत का नाही, याची चौकशी होणे आवश्यक आहे. सदर ठेकेदार हा महावितरण कंपनीचा ठेकेदार असल्याने स्वतःच्या घरी गावठाणच्या ट्रान्सफॉर्मरवर थ्री फेज मोटार चालवत असून याला रितसर बिल येते का, हा ठेकेदार वेळच्यावेळी बिल भरतो का, याची चौकशी व्हायला हवी. महावितरणचा ठेकेदार असल्यामुळे त्याला वेगळा न्याय व सर्वसामान्य ग्राहकांना वेगळा नाय ही महावितरणच्या अधिकाऱ्याकडून या ठेकेदारावर इतकी मेहरबानी का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गावठाणातल्या ट्रांसफार्मरवर थ्री फेज मोटर चालवायची परवानगी आहे का, याची देखील वरिष्ठ अधिकाऱ्याने सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

महावितरण ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणाचा ग्राहकांना बसतोय फटका!

सोनईमधील महावितरणच्या ठेकेदार हा सर्वसामान्य ग्राहकांना विनाकारण त्रास देत असून सरळ आणि लवकर कामांसाठी या ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्राहकांना जास्त पैसा मोजावे लागत आहेत. याची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचं झालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या