अहिल्यानगरमाजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली बापूसाहेब शेटे पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर...

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली बापूसाहेब शेटे पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट …!

Published on

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब शेटे पाटील यांच्या धर्मपत्नी रंजना (नानी) यांचं नुकतंच अल्पशा आजारानं निधन झालं. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री आणि नगर – राहुरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बापूसाहेब शेटे पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच सांत्वनपर भेट दिली. 

यावेळी माजी मंत्री कर्डिले यांनी बापूसाहेब शेटे पाटील यांच्याकडून या निधनाची आणि अन्य माहिती जाणून घेतली. शेटे पाटील यांच्याशी माजी मंत्री कर्डिले यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. साहित्यिक एस. बी. शेटे पाटील, शनि शिंगणापूर ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब बानकर, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील, आर. के. शेटे पाटील, डॉ. राजेंद्र शेटे पाटील, सुरेश गडाख, दादा देठे आदींसह शनिशिंगणापूरचे ग्रामस्थ आणि शेटे पाटील यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. 

स्व. रंजना (नानी) बापूसाहेब शेटे पाटील या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या त्या सासू होत्या. अत्यंत मनमिळावू आणि धार्मिक वृत्तीच्या रंजना (नानी) यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या (दि. २) सकाळी शनिशिंगणापूर अमरधाममध्ये रंजना नानी यांचा दशक्रिया विधी होणार आहे. 

… आणि माजी मंत्री कर्डिले यांनी हात जोडले…! 

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बापूसाहेब शेटे पाटील यांची सांत्वनपर भेट घेऊन उपस्थितांचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना माजी मंत्री कर्डिले यांची नजर सुरक्षा रक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर पडली. माजी मंत्री कर्डिले यांनी युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या ‘त्या’  सरकारी सुरक्षा रक्षकाला त्यांच्या गाडीजवळ बोलवलं आणि ऋषिकेश शेटे पाटील यांना कोणापासून धोका आहे? त्यांच्या बरोबर थांबून काय उपयोग, असा मिश्किल प्रश्न विचारला. यावर हजरजबाबी ऋषिकेश शेटे पाटील माजी मंत्री कर्डिले यांना ‘मग तुम्ही इमामपूर घाटाखाली या, (अर्थात आगामी विधानसभा निवडणूक नेवासा तालुक्यातून लढवा) मी पोलीस बंदोबस्तात फिरणं बंद करुन नेवासे तालुक्यात तुमचा प्रचार सुरु करतो’, असं आवाहन केलं. मात्र त्यावर माजी मंत्री कर्डिले यांनी हात जोडले आणि या दु:खद प्रसंगातदेखील उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. 

आणखी महत्वाच्या बातम्या