अहिल्यानगरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब! लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचं काय? 'तिच्या'वर वाईट नजरा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब! लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचं काय? ‘तिच्या’वर वाईट नजरा ठेवणारे डोळे अजूनही सुस्थितीत कसे आहेत? ‘तिच्या’वर वखवखलेल्या नजरा कधी बंद होणार? महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची उपाय योजना कधी होणार?

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भाषणात नेहमी सांगतात, की हे राज्य सामान्य जनतेचं आहे. मात्र सामान्यांच्या या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देणारं हे सरकार लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची हमी देणार का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या राज्यातली भोळी भाबडी जनता लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचं काय?

‘तिच्या’वर वाईट नजरा ठेवणारे डोळे अजूनही सुस्थितीत का आहेत? ‘तिच्या’वर वखवखलेल्या नजरा कधी बंद होणार? महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची उपाय योजना कधी होणार? हे आणि असे अनेक प्रश्न विचारत आहे.

देशात आणि राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे‌. या घटनांकडे सरकारचं लक्ष आहे की नाही, हाच खरा प्रश्न आहे. कलकत्ता शहरात महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या संतापजनक घटनेमुळे या राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली खरोखर सुरक्षित आहे का, यां प्रश्नाचं उत्तर या सरकारकडे तरी आहे का?

बदलापूरच्या आदर्श शाळेत एका सफाई कर्मचाऱ्यानं दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. संतप्त ग्रामस्थांनी शाळेची मोडतोड केली. विशेष म्हणजे अत्याचारित मुलींचे मेडिकल रिपोर्ट असतांनादेखील पोलिसांनी तब्बल १२ तासांनंतर संबंधित सफाई कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला. काही तासांनंतर त्या वासनांध कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी संस्थेच्या काही जणांना बडतर्फ करण्यात आलं.

दरम्यान, बदलापूरच्या या घटनेआधी अहमदनगर जिल्ह्यातल्या जखणगांवात राज हसन शेख या तरुणानं अंधाराचा गैरफायदा घेत एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नगर तालूका पोलीस ठाण्यात अक्षरशः पहाटे गुन्हा दाखल केला.

या आणि अशा अनेक घटना राज्यात आणि देशात घडत असताना सरकारी पातळीवर मात्र कमालीची उदासिनता पहायला मिळत आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध खरं तर कठोर कारवाई करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना राज्य सरकार नुसतीच घोषणाबाजी करत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी मंडळींना महिलांचा झटका बसण्याची दाट शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या