अहिल्यानगरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'ती' सभा विठ्ठलराव लंघेंसाठी नवसंजीवनी... ! पण...!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘ती’ सभा विठ्ठलराव लंघेंसाठी नवसंजीवनी… ! पण…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि. ११) नेवासे तालुक्यातल्या नामदेवनगर परिसरात जी विराट सभा घेतली, ती सभा महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे

यांच्यासाठी नवसंजीवनी ठरलीय. पण लंघे आणि त्यांच्या समर्थकांना विजयासाठी अजूनही खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. या तालुक्यातल्या हजारो लाडक्या बहिणींनी विठ्ठलराव लंघे यांनाच या निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार केला असल्याचा दावा लंघे समर्थकांमधून केला जात आहे. परंतू प्रस्थापितांना हलक्यात घेणं लंघे समर्थकांना नक्कीच परवडणारं नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत बोलताना सांगितलं, की हजारोंच्या संख्येनं मतदार जर मतदानासाठी रस्त्यावर उतरले तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट नक्की गुल होणार आहे. लंघे यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत ‘प्रोटोकॉल’ची अजिबात काळजी केली नाही. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच अनेक महिला उन्हात बसल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांना आदेश देऊन सर्व महिलांना डी झोनमध्ये बसायला जागा उपलब्ध करुन दिली. ‘विठ्ठलराव लंघे को हराना मुश्किल ही नहीं नामुमकीन हैं’ असा आत्मविश्वासदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या