बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्यूज नेटवर्क / अहमदनगर
विजेचा लपंडाव, महावितरण कंपनीची मक्तेदारी, अव्वाच्या सव्वा येणारं वीज बील, वीज बील थकल्यामुळे कधीही वीज प्रवाह खंडित होण्याची भिती. मित्रांनो, तुम्ही आता हे सारं मनातून काढून टाका. यापुढे अशी झंझट तुम्हाला कधीच येणार नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांना महावितरण कंपनीच्या मक्तेदारीचा त्रास यापुढे कधीच होणार नाही. रात्री बे रात्री महावितरण कंपनीच्या मनानुसार वीजपुरवठा होतो आणि शेतकऱ्याला बिबट्यापासून प्रचंड भीती निर्माण होते. वेळप्रसंगी बिबट्याचा हल्लादेखील आपल्या बळीराजावर होतो. मात्र यापुढे तुम्ही जर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारनं साकारलेल्या सौरऊर्जेचा वापर सुरु केलात ना तर तुम्ही दिवसादेखील तुमच्या शेतातल्या पिकांना मनमोकळेपणानं पाणी देऊ शकता.
यासंदर्भात नगर शहरातल्या मार्केटयार्ड परिसरात असलेल्या माया एपीएन सोलर कंपनीचे महाराष्ट्राचे मुख्य विक्रेते संदीप घालमे यांच्याशी रोखठोक 24 न्युज नेटवर्कनं केलेली बातचीत तुम्ही आता काळजीपूर्वक पहा आणि ऐका.
खरं तर संदीप घालमे यांचा यापूर्वीचा व्यवसाय इलेक्ट्रिकल वस्तू विकणं हा होता. मात्र सोलर ऊर्जेच्या विक्री व्यवसायात त्यांचं मन कधीपासून आणि कसं रमलं, याविषयी त्यांनी रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी मनमोकळेपणानं गप्पा मारताना हा किस्सा सांगितला. सौर ऊर्जेचे फायदे आपण कसे मिळवायचे, याबद्दलदेखील घालमे यांनी सविस्तरपणे सांगितलं.
मित्रांनो, संदीप घालमे यांना नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यांत प्रतिनिधी नेमायचे आहेत. यासाठी ज्यांची इच्छा आहे, त्यांनी संदीप घालमे यांच्याशी (माया सोलर नगर : मो. नं. 096575 65162
) एकदा अवश्य संपर्क साधावा.
धन्यवाद.